मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – राज्यात भोंग्याविरुद्ध हनुमान चालीसावरून तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच माजी आ. लक्ष्मण माने यांनी चुलत बंधूंना आवर घाला अन्यथा स्वतः गुन्हा दाखल करणार असा इशारा थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांनाच राज ठाकरेंवर टीका करताना दिला आहे.
राज ठाकरे यांचे वक्तव्य धार्मिक तेढ निर्माण करणारे असून त्यांच्याविरोधात तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांचा प्रतिकार केला पाहिजे. मात्र पंतप्रधान या राजकीय संवेदनशील परिस्थितीवर अवाक्षर काढत नाहीत. राज ठाकरेंची मागणीसह भाजपाद्वारे संविधानावर होणाऱ्या आक्रमणाचा निषेध करीत, देशात आणि राज्यामध्ये कायद्याच राज्य आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावाची समजूत काढावी.
नाहीतर घटनात्मक विधीमंडळ प्रमुख म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर गुन्हा दाखल केला नाही तर स्वत: त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असून आम्ही भारतीय लोक अभियान सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर २९ एप्रिलपासून तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने एक दिवसीय उपोषण कण्यात येणार आहे, शिवाय या बेबंदशाहीला विरोध करायला हवा म्हणून यात उतरत असल्याचा इशारा थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्रकार परिषदेमध्ये लक्ष्मण माने यांनी दिला.