यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील एका ५० वर्षीय इसमाचा शेत विहिरीत पाय घसरून विहीरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
चुंचाळे ता. यावल येथील रहिवासी तथा एरंडोल येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील शिपाई दस्तगीर नबाब तडवी (वय ५०) हे संचारबंदीमुळे सध्या चुंचाळे येथे आपल्या मूळ गावात आपल्या घरी आले होते. बुधवारी दुपारी शेती शिवारात फेरफटका मारायला गेले असतांना चुंचाळे शिवारातील प्रेमराज सिताराम चौधरी यांच्या शेतात विहिरीत पाय घसरून ते पडले. यात पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच पोलीस पाटील गणेश पाटील यांनी यावल पोलिसाना यासंदर्भात माहिती दिली व त्यांचा मृतदेह विहिरीतुन काढून प्यार करना यावल ग्रामिण रूग्णालयात आणण्यात आले. येथे डॉ. बी. बी. बारेला यांनी शवविच्छेदन करून सांयकाळी त्यांच्यावर चुंचाळे येथे अंतविधी करण्यात आला या घटनेसंदर्भात लतीफ तडवी यांच्या खबरी वरून यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे करीत आहेत.