Home धर्म-समाज चुंचाळे येथे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

चुंचाळे येथे प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम

0
27


यावल,  प्रतिनिधी  । येथे ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त  तालुक्यातील चुंचाळे  येथे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. 

 

चुंचाळे येथील आदिवासीबहुल गावठाण पाड्यवर गोरगरीब आदिवासी बांधवांच्या वस्तीवर धान्य वाटप  तसेच यावल ग्रामीण रुग्णालय आणि कोविड सेंटर येथे रुग्णांना बॉईल अंडे आणि बिसलेरी पाणी बॉटल वाटप करण्यात आले. हा उपक्रम  काँग्रेस सेवा फाउंडेशनचे प्रदेशाध्यक्ष  अॅड. सुभाषचंद्र गोडसे  यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीपभैय्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे  सरचिटणीस अजबराव पाटील यांच्या सुचनेनुसार यावल रावेरचे आमदार शिरीष चौधरी आणि जिप गटनेते तथा पं. स . जि .प . सदस्य संघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल, जिल्हामीडिया प्रमुख तसेच कोरपावलीचे युवा सरपंच विलास अडकमोल यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आला.  काँग्रेस सेवा फाउंडेशन काँग्रेस कमिटी युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, तसेच काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आदीं उपस्थित होते.  जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांच्यातर्फे जिल्हाउपाध्यक्षा मीनाक्षी जावरे, मनीषा पाटील, जिल्हासरचिटणीस विनोद पाटील, अनिल बडगुजर, भुपेश जाधवसह काँग्रेस सेवा फाउंडेशनचे सर्व जिल्हा तालुका शहर पदाधिकारी  कार्यकर्ते उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound