जिनिव्हा वृत्तसंस्था । चीनच्या प्रयोगशाळेत कोरोनाचा विषाणू तयार करण्यात आल्याचा आरोप होता. अमेरिकेने सातत्याने चीनवर आरोप केले संसर्गाच्या चौकशीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने पथक चीनला पाठवले होते. या चौकशी समितीचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेसमोर सादर होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक कार्यकारणी समितीच्या बैठकीत हा अहवाल सादर होणार आहे. ही बैठक ५-६ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे.
या चौकशी समितीकडून पहिला अहवाल सादर करण्यात येणार आहे. जागतिक आरोग्य संघटना चीनला पाठिशी घालत असल्याचा आरोप अमेरिकेकडून करण्यात येत होता. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेचे सभासदत्वही सोडले. हा आरोप जागतिक आरोग्य संघटनेने फेटाळून लावला होता. त्यानंतर चीनची चौकशी करण्यासाठी एक स्वतंत्र पॅनेल जागतिक आरोग्य संघटनेने नेमले.
आता पुढील महिन्यात या चौकशीतील पहिली माहिती समोर येणार आहे. या चौकशीचा संपूर्ण आणि अंतिम अहवाल पुढील वर्षी मे महिन्यात येणे अपेक्षित आहे. तोपर्यंत जागतिक आरोग्य संघटनेच्या होणाऱ्या बैठकीत अपडेट्स दिले जाणार आहेत.
संसर्गाचे थैमान सुरूच असून बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. जगभरातील तीन कोटीहून अधिक नागरिकांना बाधा झाली आहे. १० लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सर्वाधिक बाधित असल्याची नोंद आहे. जवळपास ७० लाख लोकांना बाधा झाली आहे. भारत आणि अमेरिकेत बाधितांची संख्या वाढत आहे. जवळपास ७३ देशांमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढली आहे.