नवी दिल्ली:– वृत्तसंस्था लडाखमध्ये सीमेवर भारताने गोळीबार केल्याचा चीनचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. उत्तर भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की भारताने कधीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडली नसून, सीमेवर शांतता राहावी असाच भारताचा प्रयत्न असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. ७ सप्टेंबरच्या रात्री चिनी लष्कराने भारतीय सैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनीच हवेत गोळीबार केला असा आरोप करत भारताने गोळीबार केलेला नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
. भारताने म्हटले आहे की, चीन सतत दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सहमतीचे उल्लंघन करत असून सतत भारताला डिवचले जात आहे. ७ सप्टेंबरला चीनी सैनिकांनी आमच्या फॉरवर्ड पोझिशनजवळ येण्याचा प्रयत्न केला. भारतीय सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी भारतीय सैनिकांवर दबाव टाकण्याच्या उद्देशाने चीनी सैनिकांनी हवेत गोळीबार केला. चीनच्या पश्चिमी कमांडरने आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर देशांनी दिशाभूल करण्याच्या उद्देशाने आपले निवेदन प्रसिद्ध केले आहे, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे.