Home Cities चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

0
82

नंदुरबार प्रतिनिधी । नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात आठ वषीय मुलीची बलात्कार करून तिची हत्या केल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्मयातील सोरापाडा तेथील आठ वषीय मुलीवर नराधमाने बलात्कार करून तिची गळा आवळून हत्या केल्याची घटना मंगळवारी (ता.२२) रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. रात्री लाईट गेली होती. त्याचा फायदा घेऊन नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले. दरम्यान, आज सकाळी शेकडो नागरिकांनी अक्कलकुवा तहसिल कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. नराधमाला फाशी द्या, अशा घोषणा या वेळी करण्यात आल्या. या प्रकरणी कमलसिंग कर्तारसिंग सिकलीकर (वय-३२) या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. संतप्त जमावाने अक्कलकुवा पोलिस स्टेशनला घेराव घालून नराधमाला फाशी देण्याची मागणी केली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound