जळगाव प्रतिनिधी । दुकानावर जाण्याच्या बहाण्याने चिमुकलीला घरात बोलावून अत्याचार करणाऱ्या नराधमास १४ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा आज जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. कटारिया यांनी ठोठावला आहे.
अधिक माहिती अशी की, १८ डिसेंबर २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आरोपी सुभाष हरचंद महाजन याने पिडीत बालिकेस दुकानावर जाण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व दरवाजा बंद करून तिच्याव लैगिंक अत्याचार केला. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात सुभाष महाजन यांच्या विरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांनी दोषारोप पत्र जळगाव सत्र न्यायालयाच्या न्या. आर.जे.कटारिया यांच्या कोर्टात दाखल केले. सरकारपक्षातर्फे एकुण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यात पीडीत मुलीची साक्ष महत्वाची ठरली. न्या. कटारिया यांनी आरोपीस दोषी ठरवत १४ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि १० हजार रूपये दंडे आणि दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. चारूलता आर. बोरसे यांनी तर आरोपीतर्फे ॲड. मुकेश शिंपी यांनी कामकाज पाहिले.