Home आरोग्य चिपळूणमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या !

चिपळूणमध्ये कोरोनाबाधित रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या !


चिपळूण (वृत्तसंस्था) चिपळूणमध्ये एका ४५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने रुग्णालयाच्या गच्चीवर गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

 

कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने या व्यक्तीला ६ ऑगस्टला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर कामथे रुग्णालयात कोविड-19चे उपचार सुरू होते. मध्य रात्रीच्या सुमारास या व्यक्तीने रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन गळफास घेतला. घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. कोरोनाच्या भीतीपोटी या रुग्णाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र नेमकं कारण अद्याप समजू शकले नाही.


Protected Content

Play sound