जळगाव, प्रतिनिधी । शहरात गर्दी होऊन कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी चौकाचौकांतील पत्रे लावून रस्ते बंद करण्यात आले होते. यात नागरिकांची गैरसोय होत असल्याचीत तक्रार येत होती. त्यानुसार महापौरांनी पाहणी करून एकेरी मार्ग खुला करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला केली होती. यानुसार चित्रा चौक ते टॉवर चौक हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
अनलॉक दरम्यान शहरात नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी शहरात ठिकठिकाणी व मुख्य चौकात पत्रे लावून वाहतूक बंद करण्यात अली होती. यात चित्र चौक ते टॉवर चौक या मार्गाचाही समावेश होता. मुख्य चौक बंद असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. यासंदर्भात महापौर भारतीताई सोनवणे यांनी पाहणी केली होती. यापाहणी दरम्यान त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार चौक ते टॉवर चौक हा मार्गवरील पत्रे काढून हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामार्गावरील दाणा बाजारकडे जाणारा रस्ता पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. तर शहरातील इतर भागांत लावण्यात आलेले पत्रे काढण्यात आलेले नाहीत. शहरातील मुख्य मार्गावरील पत्रे काढण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/292446415152118/