मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबईतील खारघर येथे असलेले केंद्रीय सुरक्षा बल अर्थात सीआरपीएफच्या आणखी सहा जवान करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे.
खारघर येथील १३९ अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असलेल्या १२ जवानांपैकी ५ जणांना याआधीच करोना झाल्याचे समजले होते. आता आणखी सहा जणांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. २ एप्रिलला उशिरा १४६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालय कळंबोली येथे ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. या सगळ्यांची कोविड-१९ चाचणी घेण्यात आली. त्यापैकी सहा जण पॉझिटिव्ह आहे.