Home आरोग्य चिंताजनक : महाराष्ट्रात ७ पोलीस अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

चिंताजनक : महाराष्ट्रात ७ पोलीस अधिकारी आणि १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रातील ७ पोलीस अधिकारी आणि १६ कर्मचारी असे एकूण २३ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर तर राज्यात एकूण ८६ पोलीस क्वारंटाईन आहेत.

 

एएनआय वृत्तसंस्थेनेनुसार महाराष्ट्रात २३ मार्चपासून आतापर्यंत एकूण २३ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये ७ पोलीस अधिकारी आहेत. तर १६ पोलीस शिपाई आहेत. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर राज्यात एकूण ८६ पोलीस क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात १६ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण २८६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर पोहोचली आहे. तर मुंबईत काल एका दिवसात १७७ नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पोलीस दलातही वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे.


Protected Content

Play sound