नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २४ तासात भारतात ‘कोरोना’चे १ हजार २११ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १० हजाराच्या पार गेला आहे. तर गेल्या २४ तासात देशात ३१ जणांचा बळी गेला आहे.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार सध्या देशात ८ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १०३५ रुग्ण बरे झाले आहेत किंवा त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. आतापर्यंत भारतात ३३९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान, कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत केंद्रीय गृहमंत्रालयाचे कार्यालय २४ तास सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.