चिंताजनक : नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण !

नवी मुंबई (वृत्तसंस्थ) नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये आतापर्यंत 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

 

शहरातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका आरोपीमुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. दरम्यान, नवी मुंबईत कोरोनाबधितांची संख्या 1422 वर पोहोचली आहे. यातील 47 जणांचा मृत्यू झाला आहे.

Protected Content