धुळे (प्रतिनिधी) येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात २४ एप्रिल रोजी घेतलेल्या साक्री येथील दोन रुग्णांच्या स्वॅबचे नमुने कोरोना विषाणूचे पॉझिटिव्ह आले आहेत. तर अन्य २८ रुग्णांचे कोरोना विषाणूचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्हच्या 17 रुग्णांवर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच 24 एप्रिल 2020 रोजी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यांचा स्वॅब नमुना घेण्यात आला होता. त्यांचा कोरोना विषाणूचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. धुळे जिल्ह्यातील कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 21 वर पोहोचली आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.