चिंताजनक : देशभरात गेल्या 24 तासांत सापडले नवीन 10 हजारहून अधिक कोरोनाबाधित

मुंबई (वृत्तसंस्था) देशभरात गेल्या 24 तासांत देशात नवीन 10 हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील 24 तासांत देशात 10 हजारहून अधिक नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 2, 97,535 हजारवर पोहोचला आहे. मागील 24 तासांत 396 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 8498 वर पोहोचला आहे. तर 1, 47, 195 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे. तर सध्या एक लाख ४१ हजार ८४२ जणांनर उपचार सुरू आहेत. भारतात कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी जवळपास 49.47 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे.

Protected Content