यावल प्रतिनिधी । चिंचोलीजवळ ट्रक आणि मिनी ट्रकच्या झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, यावल-चोपडा मार्गावर असणार्या चिंचोली गावाजवळ एमएच३४-एव्ही ४३२९ क्रमांकाचा ट्रक आणि एमएच-१९ जे २९६० या मिनी ट्रकची धडक झाली. यात मिनी ट्रकमधील दोन जण जखमी झाला आहे. जखमीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. पोलीस निरिक्षक अरूण धनवडे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे.
या अपघातात मिनी ट्रक चालक योगेश गौमत गोमटे (रा. आमोदा, ता. यावल) जखमी झाला आहे. सोबत ट्रक चालक विनोद सुखदेव यादव (रा. चंद्रपूर) यालाही दुखापत झाली असून या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.