चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील घाटरोडवरील झोपडपट्टीत गांजाच्या अड्डयावर धाड टाकून दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यात १६ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील घाटरोडवरील नवीन पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झोपडपट्टी परिसरात दोन संशयित बेकायदेशी गांजाची विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शहर पोलीस ठाण्याने पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाली. मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार १७ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलीस पथक व पंचांसह सापळा रचुन झोपडपट्टीत छापा टाकला. यात संशयित आरोपी सलीम अली अश्रम अली (वय-३५) व नसीमबी अश्रम अली (वय-५५) दोन्ही रा. झोपडपट्टी, नव्या पाण्याच्या टाकीजवळ, घाटरोड चाळीसगाव यांच्या ताब्यातून १६ लाख ५५ हजार रोख, ६५०० रूपये किंमतीचे २ किलो १७० ग्रॅम गांजा असा एकुण १६ लाख ६६ हजार ५१० रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. संपुर्ण मुद्देमालासह दोघांना अटक करण्यात आली. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या पथकातील सपोनि मयुर भामरे, पोउनि विजय साठे, पोहेकॉ गणेश पाटील, पंकज पाटील, पो.ना. विनोद भोई, सुभाष घोडेस्वार, पंढरीनाथ पवार, प्रविण सांगिले, पो.कॉ. तुकाराम चव्हाण, प्रविण सपकाळे, निलेश पाटील, राकेश पाटील, संदीप भोई, मपोकॉ सोनी अकबर तडवी यांनी कारवाई केली. पुढील तापास सपोनि मयूर भामरे करीत आहे.