अटकेतील चोरट्यांकडून ८८ हजाराचा मुद्देमाल हस्तगत

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या गुन्ह्यात अटकेतील दोन जणांकडून अजून तीन गुन्ह्यातील ८८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात चाळीसगाव ग्रामीण पोलीसांना यश आले आहे.

 

चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात १६ जानेवारी रोजी दाखल गुन्ह्यात अटकेत असलेले संशयित आरोपी योगेश राजेंद्र कुमावत (वय-२५) आणि छायाबाई उर्फ वर्षा नारायण पाटील दोन्ही रा. मुंदखेडे ता. चाळीसगाव यांना अक्क करण्यात आली होती. यापुर्वी त्यांच्याकडून गुन्ह्याची कबुली आणि मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या चोरीच्या गुन्ह्यातील १२ हजार रूपयांची रोकड आणि ५५ हजार रूपये किंमतीचा सोन्याचे दागिने काढून दिले. त्याचप्रमाणे चोरलेला १२ हजाराचा एलईडी हस्तगत केला आहे. शिवाय पातोंडा शिवारात इलेक्ट्रिक पंपाची चोरीची देखील कबुली दिली असून त्यांच्या ९ हजार रूपये किंमतीच्या  दोन पंप जप्त केले आहे. याप्रकारे चाळीसगाव पोलीसांनी दोन्ही गुन्ह्याची उकल करून सुमारे ८८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजेंद्र साळुंखे, दिलीप रोकडे, नितीन सोनवणे, मालती बच्छाव, शंकज जंजाळे, पोलीस नाईक संदीप माने, मनोज पाटील यांनी कारवाई केली आहे.

Protected Content