चाळीसगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे शालेय साहित्य वाटप

चाळीसगाव, प्रतिनिधी  ।  स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेस पार्टीच्या वतीने लहान मुलांना पुस्तके पेन्सिल व खाऊ वाटप करण्यात आला. 

 

कोरोना काळात आपल्या देशावर आलेल्या संकटाने जे मुलांच्या अभ्यासामध्ये पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्यासाठी व लहान मुलांना शिक्षणाच्या वाटेवर जाण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मुलांना  पुस्तके, पेन्सिल व खाऊ वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.  यावेळी राष्ट्रवादी युवक कांग्रेसचे तालुका अध्यक्ष मोहित  भोसले व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष गौरव  पाटील यांनी लहान मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केले व या पुढे शालेय वस्तू मुलांना देण्याचे आश्वासन दिले. यावेळी घनशाम  जगताप व शुभम  गवळे ,रुपेश वानखेडे (सामाजिक कार्यकर्ते)व (अनाथ संघटना जळगाव जिल्हा) अमोल पाटील ,साई पाटील, तेजस निकम व बिलाल पठाण यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन साई पाटील यांनी केले.

Protected Content