चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील आमदार राजीवदादा नावाच्या व्हॉटस्ॲप गृपवर समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर टाकल्याप्रकरणी येथील गृप ॲडमिनसह दोघांवर चाळीसगाव शहर पोलीसात आपत्ती कायदान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील माजी आमदार राजीवदादा नावाच्या व्हॉटस्ॲप गृपवर संशयित आरोपी वासुदेव काशिनाथ भावसार रा. त्रिमुर्ती बेकरी जवळ, हुडको कॉलनी याने दोन समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर टाकला. याप्रकरणी संशयित आरोपी वासुदेव भावसार, माजी आमदार राजीवदादा गृपचे ॲडमिन साहील खान अजमल खान रा. बाराभाई मोहल्ला, आणि कैफ शेख ईस्माईल रा. बारा भाई मोहल्ला यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुरनं १२६/२०२० भादवि १५५, ५०५ (२) आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे.