चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात असलेल्या हरीभाऊ चव्हाण निवासी अंधशाळा या ठिकाणी असलेल्या कोव्हीड सेंटरला उपचार घेत असलेल्या गरजू रुग्णांना अतिशय निकृष्ट दर्जेचे जेवण दिले जात असून यात सकस आहाराबाबत अनियमितता आढळून येत असल्याचे लक्षात येताच पीपल्स फाउंडेशनने याबाबत आवाज उठविला असून या आशयाचे नायब तहसिलदार विशाल सोनवणे यांना निवेदन दिले.
कोव्हीड रुग्णांना देण्यात येणारे स्निग्ध पदार्थ, प्रथिने, अंडी व दुधाबाबत बरेचदा रुग्णांची तक्रार असते तर पुरवठा करण्यात येणारे दुध रुग्णांपर्यंत पोहोचत नसुन दुधाची कर्मचारी परस्पर विल्हेवाट लावतात याबाबत अनेकदा तक्रार करुन ही याबबात दुर्लक्ष केले जाते याविषयक रुग्णांच्या सततच्या तक्रारी लक्षात घेता शहरातील पीपल्स फाउंडेशनच्या वतीने निकृष्ट आहाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या रेडमिसीअर इंजेक्शन व फेबिफ्ल्यू गोळ्याबाबत माहीती घेण्यात यावी या आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
याप्रसंगी नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, पीपल्स फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश पोळ, अभिजीत शितोळे, स्वप्निल कोतकर, दिपक कच्छवा, गौरव पाटील, लेवेश राजपूत, महेंद्र कुमावत, तेजस राजपूत, दिपक वाघ, प्रवीण जाधव, मंगेश सावळे आदी उपस्थित होते.