चाळीसगाव येथील अंबुजा कंपनीतून अभियंत्याची दुचाकी लांबवली

चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील अंबुजा कंपनीतील एका अभियंताने पार्कींग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याबाबत शहर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेशकुमार महादेव एरणे (वय- २९ रा. कैवल्यनगर ता. चाळीसगाव) ठिकाणी वास्तव्यास असून गुजरात अंबूजा एक्सपोर्ट कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. दि. १३ जून रोजी योगेश यांनी आपली दुचाकी (क्र. एम.एच. १९ डी.सी. ५२५०) नेहमी प्रमाणे कंपनीत पार्कींग केलेली होती. मात्र अज्ञात व्यक्तीने पार्कींग केलेली होंडा शाईन कंपनीची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.  हि घटना दि.१३ जून रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास घडली. योगेश यांनी परिसरात शोधाशोध केली असता अद्यापपावेतो दुचाकी मिळून आले नाही. म्हणून हरविल्याची खात्री झाल्याने योगेश यांनी  चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.

 

Protected Content