चाळीसगाव महाविद्यालयात वेशभूषा दिन साजरा

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे बी.पी. आर्ट एस.एम.ए. सायन्स अँड के. के. सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर. कोतकर जुनियर कॉलेज चाळीसगाव येथे पारंपरिक वेशभूषा दिवस (ट्रॅडिशनल डे) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशात विविध संस्कृत्या एकोप्याने नांदतात. विविध वेशभूषा, विविध भाषा, विविध जाती धर्म संप्रदाय आणि त्यांच्या विविधांगी, विविधरंगी संस्कृत्यांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडावे, ते त्यांनी समजून घ्यावे या हेतूने पारंपरिक वेशभूषा दिवस चे आयोजन करण्यात आले होते.

 

विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी पारंपरिक वेशभूषा करून देशातील विविधतेचे दर्शन  घडवले. पंजाबी , बंगाली, गुजराथी, राजस्थानी, महाराष्ट्रीयन , दाक्षिणात्य आदी प्रदेशातील पोशाख घागरा, शेरवानी, पैठणी , नऊवारी साडी, कोळी वेशभूषा, सलवार कमीज, धोतर कुर्ता, शेतकरी , बागायतदार, पंजाबी, बाराबंदी यांसारख्या वेशभूषा करून सर्वांनी या पारंपरिक वेशभूषा दिवसाचा मनमुराद आनंद लुटला.

 

यावेळी उपस्थित सर्वांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. व्ही.  बिल्दीकर यांनी संबोधित केले. भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे आणि तिच्या श्रेष्ठत्वाचे गमक हे याच विविधतेत आहे. या सर्व संस्कृत्यांची मिळून  श्रेष्ठ भारतीय संस्कृती तयार झाली आहे. असे मत व्यक्त केले. आणि सर्वांनी आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिका असा मोलाचा सल्लाही दिला.

 

या प्रसंगी उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. काटे , उपप्राचार्य प्रा. डी. एल. वसईकर यांची उपस्थिती होती.  प्रास्ताविक डॉ. पंकजकुमार नन्नावरे यांनी केले. सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

Protected Content