चाळीसगाव पूर्णपात्रे विद्यालयात पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज | येथील प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात विशेष पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गीत सादर केले.

येथील डॉ. सौ. प्रमिलाताई पूर्णपात्रे प्राथमिक विद्यालयात विशेष पारितोषिक वितरण समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिशुविहार शैक्षणिक संस्थेच्या सचिव मा. डॉ. सौ. शुभांगीताई पूर्णपात्रे, प्रमुख पाहुणे म्हणून पोदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलचे प्राचार्य अजय घोरपडे हे उपस्थित होते. सोबत व्यासपीठावर मुख्याध्यापक रमेश सोनवणे, बालक मंदीराच्या मुख्याध्यापिका स्वाती देशपांडे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र वराडे उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२२-२३ चा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. यात इयत्ता १ली ते ७वीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक गीते सादर केली. यावेळी या कार्यक्रमाला विद्यालयातील विद्यार्थी व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश साळुंखे, मनिषा पाटील व सुनिता ठोके यांनी तर बक्षीस पात्र विद्यार्थी यादीवाचन राजेंद्र चौधरी यांनी केले. व आभार प्रदर्शन नरेंद्र पवार यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Protected Content