चाळीसगाव-धुळे रस्त्यावरच्या अपघातात जखमी तरूणाचा मृत्यू

 

 

चाळीसगाव: प्रतिनिधी । चाळीसगाव- धुळे रस्त्यावरील शिरूड चौफुली येथे एका तरूणाचा २१ मार्च रोजी अपघात झाला होता. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना काल रात्री अचानक प्रकृतीत बिघाड झाल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाला.

 

याबाबत शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  शुभम ज्ञानेश्वर गुंजाळ (वय- २४ ) . खरजाई येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा २१ मार्च रोजी सायंकाळी  चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील शिरूड चौफुली येथे अपघात घडला. या अपघातात शुभम गुंजाळ यांना गंभीर दुखापत झाल्याने शहरातील देवरे हॉस्पिटलात दाखल करण्यात आले होते. मात्र अचानक काल त्याच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने त्यांची प्राणज्योत मावळली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाविस्कर यांच्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना  ओंकार सुतार हे करीत आहेत.

Protected Content