चाळीसगावात हिरकणी महिला मंडळातर्फे आदिवासीं कुटुंबांना फराळाचे वाटप

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील करगाव रोडवरील एकलव्यनगर(वामननगर)येथील आदिवासी कुटुंबाना दिपावळी सणानिमित्त एक हात माणूसकीचा या उपक्रमाअंतर्गत पन्नास कुटुंबाना लोकनायक स्व.तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ चाळीसगावतर्फे फराळाचे वाटप करण्यात आले.

 

हिरकणी महिला मंडळातर्फे कोकणातील पुरग्रस्त असो किंवा चाळीसगाव तालुक्यातील पुरग्रस्त असो यांना एक हात माणूसकीच्या माध्यमातून नेहमीच मदत केली जात असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबाना दिवाळी सारखे सण मोठ्या उत्साहात साजरे करणे तर दुरच उपासमारीची वेळ आली आहे. आपल्या परिने फुल ना फुलांची पाकळी म्हणून मंडळातर्फे माणूसकी जपत फराळाचे वाटप करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून चाळीसगाव करगाव रोडलगत असलेल्या एकलव्यनगर येथील कुटुंबाना फराळाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी हिरकणी महिला मंडळ चाळीसगावच्या अध्यक्षा सुचित्रा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या अनिता शर्मा, सोमनाथ माळी, सिमा माळी, प्रशांत शर्मा, अभिलाष राजपूत उपस्थित होते.

Protected Content