चाळीसगाव प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दलित पँथर व लिंगायत सेवा संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे मोफत वितरण शहरातील सिग्नल पाईंट येथे करण्यात आले.
शहरात कोरोनाने पुन्हा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. या पाश्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती हि शंभर जणांच्या उपस्थितीत साजरी करण्याचे निर्देशन शासनाने घालून दिले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दलित पँथर व लिंगायत सेवा संघ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तक वितरण सोहळाचा कार्यक्रम शहरातील सिग्नल पॉईंट येथे करण्यात आले. लेखक गोविंद पानसरे लिखीत शिवाजी कोण होता? यावेळी ह्या पुस्तकाचे २०१ प्रतींचे वितरण करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेतील पोलिस बंधूंनी ही सहभाग नोंदविला. पुस्तक वितरण सोहळा प्रसंगी प्रा. गौतम निकम, संभा जाधव, निलू बाबा, अण्णा विसपुते, रोषन जाधव, अॅड. गौतम जाधव, बबलू जाधव व अॅड. निलेश जाधव आदी उपस्थित होते.