चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या अग्रवाल यांच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून भेसळयुक्त खाद्यतेल साठ्यावर कारवाई करत साठा जप्त करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या मे. राजकुमार माणिकचंद अग्रवाल यांच्या दुकानावर अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील यांनी धाड टाकून भेसळयुक्त तेल साठ्याची तपासणी केली असता १५ लिटरचे ४९ कॅन्स व १६ बॅरल प्रत्येक १८० किलो असा ३ लाख ९३ हजार ३१० रूपये किंमतीचा भेसळ युक्त तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दुकान मालकावर रितसर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.