चाळीसगाव: प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून चाळीसगावात भाजपा युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन ३० रोजी सकाळी १० वाजता आ. चव्हाण यांचे ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात करण्यात आले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने तालुक्यात हाहाकार माजवला आहे. रक्ताच्या अभावामुळे कोणाचीही प्राणज्योत मावळू नये म्हणून भारतीय जनता पक्ष युवा मोर्चातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन आमदार मंगेश चव्हाण यांचे ‘अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात .३० एप्रिलरोजी सकाळी करण्यात आले आहे.
चाळीसगाव शहर व तालुका मिळून हे आयोजन केले आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती खा. उन्मेश पाटील , आ. मंगेश चव्हाण , प्रा. सुनील निकम (तालुकाध्यक्ष भाजपा ), घृष्णेश्वर पाटील (शहराध्यक्ष भाजपा ) व सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. या शिबिरात सहभागी होऊन जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.