चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शहराच्या हद्दीतील शिवारात अवैध गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर पोलिसांनी सदर ठिकाणी छापे टाकून तब्बल दिड लाखांचा मुद्देमाल जागीच नष्ट केला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव शहराच्या हद्दीतील टाकळी प्र.चा, ओझर व पातोंडा गावाच्या शेत शिवारात अवैध गावठी दारूची हातभट्टी सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यावर पथकाने सदर ठिकाणी गाठून विविध भागाच्या पाच ठिकाणी छापे टाकले. व यावेळी ३५० लिटर उकळते रसायन, २८०० लिटर कच्चे रसायन व ७३ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारु, मोटार सायकल व मोबाईल असे एकुण १ लाख, ३८ हजार ४० /- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन कच्चे रसायन व साहित्य जागीच नष्ट करण्यात आले.
यावेळी संतोष छगन दळवी रा. टाकळी प्र.चा. ता. चाळीसगांव, प्रकाश पांडु गायकवाड रा. टाकळी प्र. चा. ता. चाळीसगांव, जयवंताबाई जयराम सोनवणे रा. टाकळी प्र. चा. ता.चाळीसगांव, जंगलसिंग रामसिंग गायकवाड रा. ओझऱ ता. चाळीसगांव, रमेश नाईक रा. ओझर ता. चाळीसगांव यांच्या विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या निर्देशानुसार व अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, सहा. पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख व यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सपोनि विशाल टकले, सपोनि सागर ढिकले, पोउपनि सुहास आव्हाड, पोहेकॉ अजय मालचे, पंकज पाटील, पोना किशोर पाटील, राकेश पाटील, भुषण पाटील, चतेरसिंग महेर, प्रकाश पाटील, ज्ञानेश्वर गिते, राकेश महाजन, समाधान पाटील, सुनिल निकम, ज्ञानेश्वर पाटोळे, विजय पाटील, आशुतोष सोनवणे, दिलीप राक्षे, रविंद्र बच्छे, सुनिल पाटील आदींनी केली.
तत्पूर्वी चाळीसगाव शहर पोलिसांकडून मागील दीड महिन्यापासून नियुक्तीसाठी अभियान सुरू आहे. दरम्यान पोलिसांकडून अवैध दारु निर्मीतीची केंद्राचे समुळ उच्चाटनासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारचे नदी/नाला/ओढा /तलाव किंवा खाजगी क्षेत्रात विहीरीच्या बाजुला कोणी हातभट्टी लावुन अवैधरित्या गावठी दारु तयार करत असेल त्याची माहीती चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला द्यावी. असे आवाहन पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.