चाळीसगाव: प्रतिनिधी । चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल व डिझेलच्या दरात लक्षणीय वाढ झाल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. हे दर त्वरीत कमी करण्यात यावे म्हणून कॉंग्रेसकडून मोदी सरकारच्या निषेधार्थ शहरात आंदोलन छेडण्यात आले.
कोरोनाच्या काळात उत्पन्नाचे स्त्रोत ठप्प झाल्यामुळे अनेक जणांचे जगणेच असह्य झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना व परिस्थिती पूर्वपदावर येत असताना केंद्र सरकारने अचानक पेट्रोल, डिझेल, व गॅस सिलिंडरच्या दरात प्रचंड वाढ केली आहे. हे दर कमी करण्यात यावे म्हणून कॉंग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
हे आंदोलन चाळीसगाव शहर अध्यक्षा अर्चना पोळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विशाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात काँग्रेस महिला जिल्हा उपाध्यक्ष लता खलाने, काँग्रेस तालूकाध्यक्ष अनील निकम , शहराध्यक्ष देवेंद्र पाटील, मा. आ. ईश्वर जाधव, रमेश शींपी (अ. जा,) प्रदेश महासचीव राहूल मोरे, शिवाजी राजपूत, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मधू गवळी, शहराध्यक्ष प्रज्वल राजपूत, सोशल मीडियाचे पवनसिंग राजपुत, अलताफ खान, रविंद्र पोळ, रवि जाधव, पंकज शिरोडे व मोठ्या संख्येने कॉंग्रेसचे पदाधिकारी , कार्यकर्ते उपस्थित होते.