Home क्राईम चाळीसगावातून फळविक्रेत्याची दुचाकी लांबविली

चाळीसगावातून फळविक्रेत्याची दुचाकी लांबविली

0
25
bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


चाळीसगांव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | शहरात फळविक्री करणाऱ्या एका इसमाची दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना स्टेशन रोडवर घडली आहे याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील आदित्य नगरातील कल्पेश निंबा जगताप (वय-१८) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्याला असून फळ विक्री करून तो आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवीत असतो. दरम्यान कल्पेश यांनी १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता शहरातील स्टेशन रोडवरील अन्नपूर्णा हॉटेल बाहेर दुचाकी (एम.एच.१९ डीएफ ३०२३) लावली. मात्र उभी केलेली मोटारसायकल अज्ञाताने लंपास केली. त्यावर कल्पेश यांनी परिसरासह नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता ३० हजार रुपये किं.ची हिरो एच.एफ डिलक्स कंपनीची दुचाकी मिळून आली नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेली. असे खात्री झाल्यावर चाळीसगाव शहर पोलीस स्थानक गाठून कल्पेशने अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास महेंद्र पाटील हे करीत आहे‌.


Protected Content

Play sound