Home क्राईम चाळीसगावातून मजूराची दुचाकी लांबविली; गुन्हा दाखल

चाळीसगावातून मजूराची दुचाकी लांबविली; गुन्हा दाखल

bike thieves 20180259850
bike thieves 20180259850

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | शहरातील वामन नगरातील एका मजूराने घरासमोर उभी केलेली दुचाकी अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर माहिती अशी की, शहरातील वामन नगरातील सुनिल सुधाकर बागुल (वय ४५) हा मजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. मात्र त्यांनी घरासमोर उभी केलेली हिरो होंडा कंपनीची दुचाकी (क्र. एम.एच.१९ डीपी २८८८) अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना ३ मार्च रोजी रात्री १० ते ४ मार्च सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली आहे. त्यावर बागूल यांनी परिसरासह नातेवाईकांकडे आजपावेतो शोधाशोध केली असता ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून आली नाही. म्हणून चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून बागूल यांनी भादवी कलम-३७९ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पो.ना भुषण पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound