चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हुडको कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या वरच्या खोलीतून मोबाईल, टीपॉय आणि रोख रक्कम लांबविल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील शेखर गुलाबराव देशमुख (वय-४४) रा. त्रिमुती बेकरी समोर, हुडको कॉलनी किरकोळ सामान विक्रीचे काम करतात. हुडको कॉलनीत त्यांच्या दुमजली इमारत आहे. वरच्या घर हे बेडरूम आहे. ११ डिसेंबर रोजी रात्री १२.३० वाजेच्या सुमारास सर्वजण खाल्याच्या घरात झोपले होते. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घरात अनाधिकृतपणे वरच्या घराचा दरवाजा उघडून आता प्रवेश करत घरातील टीपॉय, मोबाईल आणि शेख देशमुख याच्या पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले २ हजार २०० रूपये रोख असे एकुण १४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार सकाळी १३ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात शेख देशमुख यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पाहेकॉ विजय शिंदे करीत आहे.