पाचोरा, प्रतिनिधी ।चाळीसगाव येथील चित्रकार तथा कलाकार मनोज पाटील यांनी आपल्या करगाव रोडस्थित घराजवळील मोकळ्या जागेत भव्य दिव्य असा सिंहगडचा प्रतिकात्मक किल्ला साकारला असून शहरातील अनेक शिवप्रेमी या किल्ल्याला आवर्जून भेटी देत आहे.
सिंहगड किल्लाचा हुबेहूब प्रतिकात्मक किल्ला मनोज पाटील यांनी उभारल्याने चाळीसगाववासीयांना इथेच प्रत्यक्ष सिंहगड दर्शन होत असल्याची अनुभूती मिळत आहे. मनोज पाटील यांच्या उपक्रम हा सर्वत्र कुतूहलचा विषय ठरत आहे. मनोज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने भव्य दिव्य असा सिंहगड किल्ला साकारल्याने खऱ्या खुऱ्या किल्ल्याचे चाळीसगाववासीयांना प्रत्यक्ष दर्शन होईल अशा स्वरूपाचे या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असलेले अनेक ऐतिहासिक बाबी या किल्ल्यामध्ये दर्शवण्यात आल्या आहेत. जसे की तोफखाणे, कल्याण दरवाजा, पुणे दरवाजा, तान्हाजी मालसुरे स्मारक, राजाराम महाराज यांची समाधी अश्या अनेक कलात्मक कृती या किल्यात दाखविले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या अथक परिश्रमातून या किल्ल्याची उभारणी केली असून कुटुंबातील सर्व सदस्यांच्या मदतीने या किल्ल्याची उभारणी करण्यात आली आहे. तब्बल दोन ट्रॅकटर माती आणि सिमेंट वाळू किल्याच्या उभारणी करिता लागली आहे. शहरातील कला प्रेमी व शिवप्रेमींसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबासह ह्या कलाकृतीला भेट देऊन छत्रपतींच्या आठवणींना उजाळा द्यावा असे आवाहन मनोज पाटील यांनी केले आहे. पाटील यांनी या आधीही आपल्या हस्तकलाच्या सहाय्याने अनेक कलात्मक चित्र व रांगोळी तसेच विविध प्रकारचे मूर्ती साकारली असून तसेच शाडूमतीच्या गणेश मूर्तीही त्यांनी बनविली आहे. त्यांच्या या कलाकृतीला शहरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात जर एक चांगली जागा आपल्याला उपलब्ध झाली तर आपण याही पेक्षा अधिक भव्यदिव्य मोठा किल्ला उभारणार असल्याची भावना त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केली आहे.
https://www.facebook.com/508992935887325/videos/1146620432460713