चार वर्षीय मुसर्खर शेखने ठेवले पवित्र रमजानचे रोजे

 

यावल,  प्रतिनिधी ।  येथील  सुर्दशन चित्र मंदीर चौक डांगपुरा या परिसरात राहणारे युवा सामाजिक कार्यकर्ते अल्ताफ शेख समद यांच्या चार वर्षीय चिमकुल्या मुसर्खर शेख यांने पवित्र रमजान महीन्यातील रोजा ( उपवास ) ठेवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

मुसर्खर शेख यास  आजी, आई, वडील, काका पत्रकार काबीज शेख यांनी आशीर्वाद दिले आहे. या चार वर्षीय मुसर्खर शेख याने रोजा ( उपवास ) सोडतांना संपूर्ण जगाला या कोरोना महामारीच्या संकटातुन बाहेर काढण्याची अल्लाहकडे नमाज पठणातुन प्रार्थना केली.

Protected Content