जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातून खाजगी वाहनाने गावठी पिस्तूल व जिवंत काडतूसे विक्रीसाठी नेत असतांना दोन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता अटक केले आहे. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे चार गावठी पिस्तूल आणि १० जिवंत काडतूसे हस्तगत करण्यात आले आहे. दोघांवर चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती, अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील काही व्यक्ती हे मध्यप्रदेशातून अवैधरीत्या गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या इरादाने खासगी वाहनातून चोपडा शहरातून बाहेर जात असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार रविवारी १३ नोव्हेंबर रोजी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे, पोहेकॉ सुनील दामोदर, महेश महाजन, पो.ना. रवींद्र पाटील] परेश महाजन, दीपककुमार शिंदे, चालक मुरलीधर बारी असे पथक तयार करून चोपड्याला रावाना केले. चोपडा शहरातील शिवाजी चौकात सापळा रचुन उमर्डीकडून येणाऱ्या वाहनांची रात्री ११ वाजता तपासणी केली. यामध्ये (एमएच १९ डीएम ७७७८) हे वाहन तपासणी केली असता वाहनाच्या पायदानाखाली ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतूसे आढळून आले. पोलिसांनी याबाबत विचारले असता त्यांच्याकडे वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी राजेंद्र उर्फ पप्पू भीमा चव्हाण (वय-३२) आणि गणेश ज्ञानेश्वर सातपुते (वय-२३) दोघी रा. श्रीरामपूर जि. अहमदनगर यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ गावठी पिस्तूल, १० जिवंत काडतूसे, ३ मोबाईल आणि १ हुंडाई कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांवर चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.