चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | चारित्र्यावर संशय घेऊन पतीने दगडाने ठेचून निघृणपणे पत्नीची हत्या केल्याची थरारक घटना शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्या परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव येथील प्रकाश उर्फ भुरा सोनवणे हे आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने चाळीसगाव शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा येथे आलेले असताना चारित्र्यावर संशय घेऊन सोनवणे यांनी दगडाने ठेचून पत्नीचा निघृणपणे हत्या केली. मायाबाई प्रकाश उर्फ भुरा सोनवणे (वय- ४०) असे मृत झालेल्या विवाहितेचा नाव आहे. हि धक्कादायक घटना २६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ ते १२ वाजताच्या सुमारास शहरातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी प्रकाश उर्फ भुरा सोनवणे याला ताब्यात घेतले आहे. गं.भा. भारतीबाई गायकवाड यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.