जळगाव , प्रतिनिधी । शहरातील चारही प्रभाग समिती सभापतींची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी केली.
प्रभाग समिती सभापतींच्या निवड प्रक्रियेसाठी आज पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षेतेखाली ऑनलाईन विशेष सभा घेण्यात आली. यात प्रथम प्रभाग समिती क्रमांक १ साठी प्रतिभा सुधीर पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतमधील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. शेवटच्या दिवशी चारही प्रभागांमधून भाजपतर्फे प्रत्येकी एक अर्ज दाखल करण्यात आला होता. यात प्रभाग क्रमांक-१ मधून प्रतिभा सुधीर पाटील; प्रभाग क्रमांक-२ मधून मनोज आहुजा; प्रभाग क्रमांक-३ मधून सुरेखा नितीन तायडे तर प्रभाग क्रमांक-४ मधून उषा संतोष पाटील यांचा प्रभानिहाय एकमेव अर्ज आल्याने पीठासन अधिकारी श्री. राऊत यांनी जाहीर केले. चारही प्रभागातीलसभापतींची बिनविरोध निवड झाल्याने महापालिकेतर्फे त्यांचा सॅनिटायझर व मास्क देऊन स्वागत करण्यात आले.