चहाचे दुकान फोडून रोकड लांबविली

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या नागझिरी दर्ग्यानजीकच्या चहाचे दुकान फोडून चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, रावेर शहरातील नागझिरी दर्ग्यानजीक शेख अनिस शेख मौस मोहम्मद यांचे चहाचे दुकान आहे. २९ डिसेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शेख जाहीद शेख दाऊद (वय-२१) रा. नागझिरी मोहल्ला, रावेर हा चहाच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश करत दुकानातून २ हजार रूपये चोरले. चहाच्या दुकानातून शेख जाहीद यानेच चोरी केल्याचा संशयिय शेख अनिस यांनी व्यक्त केला. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रावेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी शेख जाहीद शेख दाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इस्माईल शेख करीत आहे.

 

Protected Content