जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जाती प्रवर्गातील चर्मकार समाजावर वाढत्या अत्याचारांच्या घटनांबाबत संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशनतर्फे जिल्हाधिकारी अभिजित राऊन यांना मागणीचे निवेदन दिले.
निवेदनात २८ जुलै २०२० रोजी बिड जिल्ह्यातील साबळेश्वरयेथील चर्मकार समाजाचे सुरज कांबळे नामक व्यक्तिवर डोक्यावर कुऱ्हाडीने वार करुण प्राणघातक हल्ला झाले.
महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करुण चर्मकार समाजावर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना होण्याचे मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी निश्चितच निंदाव्यजनक आहे. तसेच बिड, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, नागपुर अशा अनेक जिल्ह्यात हत्याकांडसारखे सुद्धा प्रकार झालेले आहेत. यामुळे राज्यातील चर्मकार समाजात शासनाविषयी तिव्र असंतोष बळावत आहे. त्याबाबतीत राज्यातील वाढत्या जातीय तेढ निर्माण करुण समाजात अत्याचारांच्या घटना रोखण्यासाठी विशेष मोहिम हाती घेऊन अत्याचार प्रतिबंध करण्यासाठी शासनाने नियोजन करुण अनुसुचित जातीसाठी प्रतिबंध कृती कार्यक्रम राबविण्यासाठी संत रविदास चर्मकार युवा फाऊंडेशन कार्यक्षेत्र संपूर्ण भारत यांच्याकडुन जिल्हाधिकारी शासनाला निवेदन सादर करण्यात आलेले आहे. निवेदन देतांना जळगांव जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे, उपजिल्हाध्यक्ष दिनेश भोळे, शहराध्यक्ष दिपक बाविस्कर आदींच्या उपस्थितीत मागणीचे निवेदन दिले.