धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चरित्र्याचा संशयावरून मध्यरात्री पत्नीच्या आंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक घटना तालुक्यातील हिंगोणे बुद्रुक गावातील भिलाटी भागात येथे सोमवारी ३ एप्रिल रोजी दुपारी अडीच्या वाजेच्या सुमारास घडली आहे. मिराबाई संतोष भील (वय-५५) असे मयत विवाहितेचे नाव असून यात पती संतोष आखाडू भिल हा देखील भाजला गेला असून त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
अधिक माहिती अशी की, संतोष अखाडू भिल हा पत्नी मिराबाई व मुलगा शिवदास यांच्यासोबत वास्तव्याला होता. गेल्या दोन वर्षांपासून संतोष हा पत्नी मिराबाई यांच्याशी भांडण करून वेगळा राहत होता. चरित्र्याच्या संशयावरून सोमवारी ३ एप्रिल रोजी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास संतोष भिल याने पत्नी मिराबाई या झोपेत असतांना अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, विवाहितेचा मृत्यू झाला. या आगीत पती संतोष देखील भाजला गेल्याने त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी मुलगा शिवदास संतोष भिल याने दिलेल्या फिर्यादीवरून संतोष आखाडू भिल रा. हिंगोणे बुद्रुक ता.धरणगाव याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे.