पाचोरा, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सोपान कृष्णा व्हनमाने यांची राज्य सरकारी गट – “ड” (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या महाराष्ट्र विभागीय सहसचिव पदावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी एका पत्रकान्वये केली आहे.
सुभाष थोरात यांच्या निधनामुळे ही जागा रिकामी झाली होती. हा निर्णय संघटनेच्या नाशिक येथील राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत घेण्यात आला. या नियुक्तीच्या माध्यमातून सोपान कृष्णा व्हनमाने हे विभागांतर्गत येणा-या सर्व जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांसमवेत समन्वय साधून तसेच त्यांना सोबत घेऊन महासंघाचे कार्य वाढविण्याचे आणि कर्मचा-यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या, समस्या, प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील, संघटना बळकट करतील, असा विश्वास भाऊसाहेब पठाण यांनी व्यक्त केला आहे.