चंद्रपूर (वृत्तसंस्था) चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात जुन्या वादातून गोळ्या घालून कोळसा व्यवसाय करणाऱ्या एका युवकाची हत्या करण्यात आली. सुरज बहुरिया असे मयत व्यक्तीचे नाव असून या घटनेनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सुरज बहुरिया नावाच्या कोळसा व्यवसायिकाचा चंद्रपुरात व्यवसाय आहे. त्याची गोळ्या घालून दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. बल्लारपूर शहरातील जुना बस स्टँड भागात हा प्रकार घडला. सुरज बहुरिया हे एका हॉटेलमध्ये जेवण करत होते. जेवण झाल्यानंतर सुरज कारमध्ये बसण्यास गेले. त्याचवेळी काही युवक दुचाकीने कारजवळ येत त्यांनी त्यांनी गोळ्या झाडून सुरजची हत्या केली. पोलिसांनी या हत्येप्रकरणी अल्फ्रेड अँथनी आणि प्रणय सेजल अशा 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे. अद्याप इतरांचा शोध सुरु आहे. भरदिवसा चौकात झालेल्या एका हत्येने दहशतीचे वातावरण पसरले आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आली.