मुंबई (वृत्तसंस्था) शरद पवार याचे अर्ध आयुष्य राज्यात आणि अर्ध दिल्लीत नेतृत्व करण्यात गेले आहे. त्यामुळे पाटील यांनी राज्यस्तरीय नेत्यांवर काय ती टीका करावी, पण पवारांबाबत सांभाळून बोलावे असा इशाराही भुजबळ यांनी दिला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकरणासाठी समाजात दुही निर्माण करू नयेत, अशी टीका केली होती. यावरूनच राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी पाटलांना प्रतिउत्तर दिले असून, शरद पवार जे करतात त्याची कल्पना सुद्धा चंद्रकांत पाटलांना येणार नाही. त्याच्यातून जो काय संदेश द्यायचा ते त्यातून देतात. त्यामुळे शरद पवारांबाबत सांभाळून बोला असा इशाराही दिला आहे.