श्रीनगर : वृत्तसंस्था । जम्मू काश्मीरमधील कुपवाडामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लष्कराने केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. उत्तर काश्मीरमध्येही अनेक ठिकाणी शस्त्रसंधीचं उल्लंघन झाले आहे.
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असं अधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारी गोळीबारात ते जखमी झाले होते. एक जवान कॉन्स्टेबल वासू राजा जखमी आहे त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं .
बंदिपोरा जिल्ह्यात सर्वात प्रथम शस्त्रसंधी उल्लंघन करण्यात आलं. यानंतर काही मिनिटांनी कुपवाडामधील केरन सेक्टरमध्ये गोळीबार झाला. पाकिस्तान लष्कराकडून बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येही गोळीबार करण्यात आला. भारतीय लष्कर तिन्ही ठिकाणी योग्य प्रत्युत्तर देत आहे.