जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील सामरोद येथे घर विकत घेण्याच्या कारणावरून बापासह मुलगा आणि सुनेला बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात बुधवारी ३० मार्च रोजी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, चिंधू रामजी कोळी (वय-६३) रा. सामरोद ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भाऊ धनजी कोळी यांचे घर गावातील चांगदेव कोळी यांनी विकत मागितले होते ते दिले नाही. त्याच घरात घरात चिंधू कोळी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. याचा राग मनात ठेवून चांगदेव नामदेव कोळी, विनोद नामदेव कोळी, योगेश चांगदेव कोळी, सागर विनोद कोळी, निलेश चांगदेव कोळी, कुसुमाबाई चांगदेव कोळी, वैशाली निलेश कोळी आणि प्रभा विनोद कोळी यांनी चिंधु कोळी यांच्यासह त्याचा मुलगा आंनद आणि सुन चंदा यांना चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व जीवेठार मरण्याची धमकी दिली.