जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्तीनगरातील एका भागात राहणाऱ्या महिलेला घरी बोलावून तिच्या तोडावर मारून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केल्याची घटना उघडकीला आले आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या २३ वर्षीय महिलेशी डिगंबर उर्फ सुनील जानकीराम चौधरी (रा. निवृत्तीनगर) याने सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजता संपर्क साधला. मला सर्व मिटवायचे असून तू घरी असे सांगून विवाहितेला घरी बोलविले. ही महिला त्याच्या घरी गेली असता काही समजण्यापूर्वीच त्याने महिलेच्या तोंडावर मारले व तिचा विनंयभंग केला. तू मला हवी आहेस असा तो ओरडू लागल्याने चौधरी याची आई व भाची घरातून बाहेर आले. महिलेने त्याच्या तावडीतून सुटका करण्याचा प्रयत्न केला असता तिचे कपडेही या तरुणाने फाडले. याप्रकरणी महिलेने रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यावरून डिगंबर उर्फ सुनील चौधरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ वंदना राठोड करीत आहेत.