घरा बाहेर पडू नका ! …आम्ही पुरवू तुम्हाला घरबसल्या सेवा : नगरसेवक मराठेंचा स्तुत्य उपक्रम (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाची साखळी तोडायची असे तर नागरिकांनी घरात राहणे आवश्यक आहे. आपल्या प्रभागातील प्रत्ये-क व्यक्ती सुरक्षित रहावा याकरिता प्रभाग क्र. १३ चे नगरसेवक जितेंद्र मराठे यांनी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन केले असून प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवण्यासाठी नियोजनाची साखळी बनवली आहे.

दिवसेंदिवस शहरात देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रत्येक प्रभागात कोरोनाचा शिरकाव होताना दिसून येत आहे. एका व्यक्तीला कोरोना झाला म्हणजे त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने घरात सुरक्षित राहणे आवश्यक आहे. परिसरातील एकही व्यक्ती घराबाहेर पडायला नको यासाठी प्रभाग क्रमांक १३ चे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी एक उपक्रम सुरु आहे. या उपक्रमात त्यांनी किराणा, भाजीपाला, दूध मेडिसीन यांसह महिलांना आवश्यक असणाऱ्या वस्तू घरपोच पोचवण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक वस्तूसाठी तीन तरुणांचे संपर्क क्रमांक देण्यात आले असून नागरिकांनी संबंधित व्यक्तीला फोनद्वारे संपर्क साधत आपल्या वस्तू सांगायच्या आहे. यामुळे प्रत्येक व्यक्तीला वस्तू देखील मिळतील व नागरिक घरात सुरक्षित देखील राहतील.

असा साधणार संपर्क
प्रभागातील कोणत्याही व्यक्तीस किराणा हवा असल्यास प्रशांत महाजन (९८५०६९५९५९), तुषार मराठे (९०२८१५५८८४), जयेश सोनगिरे (९१४५७८८१८५), भाजीपाल्यासाठी पुष्पेश पाटील (८९५६४३८०२८), रोहित भोई (७७०९३६१७३५), गिरीश राक्षे (९०२११११९२०), दूध हवे असल्यास अमोल वाणी (९१५६९९७८४०), मंगल जाधव (९११२०९१९१७), मेडिसीन अथवा रुग्णालयासाठी जितेंद्र मराठे (८८०५१०५१५१), महिलांना काही आवश्यक साहित्य हवे असल्यास तनवी महाजन (९८५०६९०९००) यांना सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान संपर्क साधता येणार असून त्या वस्तू दुसऱ्या दिवशी सकाळी ८ ते ११ यावेळेत घरपोच दिल्या जातील.

२२ हजार नागरीकांना मिळणार लाभ
प्रभागात २५ कॉलन्यांमध्ये एकूण २२ हजार नागरिक वास्तव्यास आहे. नगरसेवक मराठे यांचे प्रभागाचे ६ ते ७ व्हॉट्स ग्रुप असून यात हजारो नागरिक ऍड आहे. तर काही कॉलन्यांचे स्वतःचे ग्रुप आहे. या ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना या उपक्रमाची माहिती पोचवण्यात आली असून आपल्या प्रभागासाठी निस्वार्थ कार्य केल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवकाचे व या उपक्रमाचे कौतुक केले आहे. दरम्यान, नगरसेवक मराठे यांनी आपल्या प्रभागातील ज्या घरांना क्वारंटाईन केलेले आहे अशा घरातील कुटुंबियांना न मागता किराणा व दूध वाटप केले. यामुळे त्यांना घरबसल्या जीवनावश्यक वस्तू मिळाल्या.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/544342176474893/

Protected Content