जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनीतील १९ वर्षीय तरुणाने सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात एकच गर्दी केली होती.
आकाश सुरेश शेरे (वय-१९) रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, आकाश शेरे हा आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत वास्तव्याला होता. आकाश हा एमआयडीसी परिसरात चहाची टपरी चालवून आपला उदरनिर्वाह करत होता. नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता आकाशाने आईला चहाच्या टपरीवर सोडून तो परत घरी आंघोळ करण्यासाठी आला होता. दरम्यान त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा टपरीवर का आला नाही, त्यामुळे त्याची आई सविता यांनी घरी आल्या. घरात जाताच आकाशने छताला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसताच आईने एकच हंबरडा फोडला होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आईने आरडाओरड केल्यानंतर शेजारी राहणारे नागरिक व तरुणांनी एकच धाव घेऊन मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. मयताच्या पश्चात आई सविता, भाऊ दीपक आणि दोन विवाहित बहीण असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.